केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी तामिळनाडू कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तर कॉपी करण्यास मदत केल्याबद्दल या अधिकाऱ्याच्या पत्नीला हैदराबाद येथून अटक केली आहे. चेन्नईतील एमोर येथील केंद्रावर लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा पेपर सुरु होता. यावेळी कॉपी करणाऱ्या सफीर करीम याला केंद्रीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी अटक केली. करीम तिरुनलवेल्ली येथे सहाय्यक पोलिस अधिक्षक पदावर कार्यरत आहे. त्याने कॉपी करण्यासाठी मोबाईल फोन, ब्लूटूथ आणि कॅमेऱ्याचा वापर केला होता. यासाठी करीमला त्याची पत्नी जेसी जॉय हैदराबाद येथून मदत करत होती. जेसी फोनवरून करीमला उत्तर सांगत असल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. करीम मुळचा केरळमधील आलुवा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने 2015मधील युपीएससी परीक्षेत 112 क्रमांक पटकावला होता. त्याआधीच्या परीक्षेत करीम मुलाखतीसाठी पात्र ठरला नव्हता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews